हृदय पिळवटून टाकणारी बातमी; कोल्हापुरात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी तोडले लचके

| Updated on: Apr 20, 2023 | 2:46 PM

Kolhapur CPR Hospital News : कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आवारात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडले; पाहा व्हीडिओ...

कोल्हापूर : कोल्हापूरमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालय आवारात दोन अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीपीआर रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाबाहेरील पत्र्याच्या शेडजवळ अत्यावस्थेत अर्भक आढळलं. हे मृत अर्भक कुठून आलं, याबाबत संभ्रम आहे. सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय कचऱ्यातून कुत्र्यांनी दोन्ही अर्भक आणली असल्याचा संशय आहे. ही अर्भक बाहेरून कोणी आणून टाकली का याबाबतही शोध सुरू सध्या सुरू आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जातोय.

Published on: Apr 20, 2023 02:45 PM
‘हे’ अस्तित्वात आलं तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला; राष्ट्रवादी नेत्याची सरकारवर टीका
संजय राऊत काय सगळ्या जगाचे तारणहार नाहीत!; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा टोला