भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोप, नव्या पदाधिकारी निवडीवर कुठं संताप?
VIDEO | भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडीनंतर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज, अनिरुद्ध केसरकर यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर भाजपमधील हा अंतर्गत कलह उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.
कोल्हापूर, ९ सप्टेंबर २०२३ | कोल्हापुरमध्ये भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या नूतन पदाधिकारी निवडीनंतर कोल्हापुरच्या आजऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. इतकंच नाहीतर आजऱ्यामध्ये भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारानंतर भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आजऱ्यात असणाऱ्या कार्यालयातील फलक उतरवला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कार्यालयावरील झेंडा उतरवून दरवाजावरील कमळ चिन्हही पुसून टाकले आहे. भाजपच्या अनिरुद्ध केसरकर यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर भाजपमधील हा अंतर्गत कलह उफाळून आल्याचे बघायला मिळाले. या घडलेल्या प्रकारानंतर कोल्हापूर तालुक्यातील भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आज बैठक घेऊन पुढची भूमिका ठरवणार आहेत. तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आता चिंतन करावे लागणार आहे.