कोल्हापुरातल्या कणेरी मठात पंचमहाभूत लोकोत्सवाला सुरूवात; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कोल्हापूरतल्या कणेरी मठ इथं आजपासून पंचमहाभूत लोकोत्सवाला सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचं उद्घाटन झालं. पाहा व्हीडिओ...
कोल्हापूर : कोल्हापुरातल्या कणेरी मठ इथं आजपासून पंचमहाभूत लोकोत्सवाला सुरवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पंचमहाभूत लोकोत्सवाचं उद्घाटन झालं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि इतर प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पंचमहाभूत लोकोत्सव होणार आहे. पंचमहाभूत लोकोत्सवाच्या निमित्ताने कणेरी मठच्या तब्बल 600 एकर परिसरात वेगवेगळी प्रदर्शनं भरवण्यात आली आहेत. 40 लाखाहून अधिक लोक भेट देतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. कणेरी मठाचे मठाधीपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या संकल्पनेतून पंचमहाभूत लोकोत्सव सोहळा होतो आहे.
Published on: Feb 20, 2023 12:59 PM
Latest Videos

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?

पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
