कोल्हापुरात पाण्यासाठी वणवण! महिलांचा मोर्चा, हॉकी स्टेडियम परिसरात रास्ता रोको
कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात १५ दिवस पाणीच नाही, संतप्त महिलांचे रास्ता रोको आंदोलन
कोल्हापुरात महिलांना पाण्यासठी मोर्चा काढला आहे. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात महिलांनी हा मोर्चा काढला असून मोठ्या संख्येने महिला या मोर्च्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या अनेक दिवसांत या भागात पाणी समस्या निर्माण झाल्याने पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत होती.
हा रस्ता रोको मार्चा काढत महिलांनी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी देखील केली. तांत्रिक कारणाने गेल्या १५ दिवसांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात गेल्या १५ दिवस पाणीच आलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आणि महिला आक्रमक झालेत. यासंबधी सतत अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात येत होती, मात्र तरी देखील कोणतीही दखल घेतली जात नसल्याने महिला थेट रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळी महिला पाण्याच्या कळशा आणि हंडे घेऊन थेट रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले आहे.