गावातील जि.प. शाळेचे अद्ययावत ऑनलाईन क्लासरुम, कॉन्व्हेंटला लाजवले असं शिक्षण

गावातील जि.प. शाळेचे अद्ययावत ऑनलाईन क्लासरुम, कॉन्व्हेंटला लाजवले असं शिक्षण

| Updated on: Aug 23, 2021 | 8:12 PM

कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे पर्यायाने ऑनलाईन वर्ग घ्यावे लागत आहेत. मोठ्या शहरातल्या खासगी शाळा गलेलठ्ठ फी घेतात आणि वेगवेगळ्या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.

कोरोना संकटामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे पर्यायाने ऑनलाईन वर्ग घ्यावे लागत आहेत. मोठ्या शहरातल्या खासगी शाळा गलेलठ्ठ फी घेतात आणि वेगवेगळ्या अॅपद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. त्याचवेळी प्राथमिक शाळांना मात्र गूगल मिट अॅपचा वापर करावा लागतोय. यात तांत्रिक अडचणी इतक्या येतात की हे शिक्षण नकोच अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. मात्र शिक्षक संदिप गुंड यांनी ऑनलाईन शाळा हे अॅप बनवलं आहे जे सगळ्या अडचणींवर मात करुन दर्जेदार शिक्षण देतंय.