MHADA Lottery : मुहूर्त ठरला! कोकण मंडळातर्फे 5, 311 सदनिकांची 'या' तारखेला सोडत

MHADA Lottery : मुहूर्त ठरला! कोकण मंडळातर्फे 5, 311 सदनिकांची ‘या’ तारखेला सोडत

| Updated on: Feb 15, 2024 | 1:30 PM

म्हाडाच्या अर्जदारांना 'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४ : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर जिल्हा, पालघर, रायगड येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५ हजार ३११ सदनिकांची संगणकीय पद्धतीने सोडत निघणार आहे. दिनांक २४ फेब्रुवारी, अर्थात शनिवारी रोजी सकाळी ११ वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे ही सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. यासह या सोडतीला केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह उपस्थित राहणार आहेत. तर अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तसेच म्हाडाचे अधिकृत फेसबूक https://www.facebook.com/mhadaofficial या पेजवर सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Published on: Feb 15, 2024 01:30 PM