Konkan Railway : गावाक चला… गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून मध्य रेल्वेचा निर्णय, उद्यापासून…
यंदा कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी आरामात जाता येणार कारण मध्य रेल्वेकडून तसा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून खास गणेशोत्सवासाठी २०२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. उद्यापासूनच गणपती विशेष ट्रेनचं बुकिंग देखील सुरू होणार आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी आरामात जाता येणार कारण मध्य रेल्वेकडून तसा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून खास गणेशोत्सवासाठी २०२ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. उद्यापासूनच गणपती विशेष ट्रेनचं बुकिंग देखील सुरू होणार आहे. त्यामुळे पटापट गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आपली सीट बुक करा… गणेशोत्सवासाठी आपल्या गावी किंवा घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेकडून या २०२ विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
- १) मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११५१
- २) मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११५३
- ३) एलटीटी – कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या ) – ट्रेन क्रमांक ०११६७
- ४) एलटीटी – सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या) – ट्रेन क्रमांक ०११७१
- ५) दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या) ०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून
- ६) एलटीटी – कुडाळ स्पेशल (१६ फेऱ्या) – ०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
- ७) एलटीटी कुडाळ स्पेशल (६ फेऱ्या) – ०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
Published on: Jul 20, 2024 11:35 AM
Latest Videos