Konkan Railway BIG Update : कोकणात रखडलेल्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा, तब्बल 27 तासांनंतर…
२४ तासांपेक्षा अधिक काळ रेल्वे ठप्प होती. दरम्यान, तब्बल २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे रूळावर कोसळलेल्या दरडीचा मलबा आणि चिखल दूर करण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत..
कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. त्यामुळे २४ तासांपेक्षा अधिक काळ रेल्वे ठप्प होती. दरम्यान, तब्बल २७ तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. रेल्वे रूळावर कोसळलेल्या दरडीचा मलबा आणि चिखल दूर करण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर कोकण रेल्वेची वाहतूक आता सुरळीत झाली आहे. रविवारी संध्याकाळी ७ वाजेपासून ठप्प असलेली रेल्वे वाहतूक अखेर सुरू झाली आहे. २७ तासांनंतर कोकण रेल्वेसेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत झाल्यानंतर मांडवी एक्स्प्रेस गोव्याकडे रवाना झाली. कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसाठी एसटी प्रशासनाकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे बस मिळताच प्रवाशांनी आपल्या घरची वाट धरल्याचे पाहायला मिळाले.