Konkan Railway Update : कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला, पण तरीही...

Konkan Railway Update : कोकण रेल्वे गेल्या 24 तासांपासून ठप्प, ट्रॅकवरील दरड बाजूला, पण तरीही…

| Updated on: Jul 15, 2024 | 6:07 PM

कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे एका जागीच उभ्या होत्या. दरम्यान, प्रशासन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आज 24 तास उलटून गेल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती मिळतेय.

रखडलेल्या रेल्वे प्रवसाला 24 तास पूर्ण झाले असूनही अध्याप कोकण रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे. गेल्या 24 तासांपासून कोकण रेल्वेची वाहतूक ही ठप्पच आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. त्यामुळे कोकणातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या रेल्वे एका जागीच उभ्या होत्या. दरम्यान, प्रशासन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. आज 24 तास उलटून गेल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर कोसळलेली दरड बाजूला हटवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती मिळतेय. तर रेल्वे ट्रॅकवर कोसळलेला दरडीचा मलबा हा सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या सुरु आहे. परिणामी कोकण रेल्वे ठप्प झाल्यामुळे आता परतीच्या प्रवासासाठी एसटीची व्यवस्थाही अडकून पडलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी करण्यात आली होती. विविध रेल्वे स्टेशनवरून खोळंबलेल्या प्रवाशांना एसटी बसच्या माध्यमातून सोडलं जातं आहे.

Published on: Jul 15, 2024 06:07 PM