Konkan Railway : कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, 15 तासांपासून प्रवासी एकाच जागी अडकले; ‘या’ 9 एक्स्प्रेस रद्द, कारण काय?
कोकणात कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गोव्यातील पेडणे बोगद्यात पुन्हा एकदा माती आणि चिखल खच साचल्याने रात्री तीन वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. आज पहाटे 10 जुलै 2024 रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात येत आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून कोकणात कोसळणाऱ्या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. गोव्यातील पेडणे बोगद्यात पुन्हा एकदा माती आणि चिखल खच साचल्याने रात्री तीन वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर कोकण रेल्वेकडून नऊ एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी एक्सप्रेस, मँगलूरु एक्स्प्रेस, अशा प्रमुख गाड्यांचा समावेश आहे. काल देखील बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वेची गोव्याला जाणारी वाहतूक बंद झाली होती. आज पहाटे 10 जुलै 2024 रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात येत आहेत. गोवा येथील पेडणे बोगद्यात पाणी आल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प झालीय. रात्री तीन वाजता या बोगद्यात पाणी आले आणि रेल्वे सेवा ठप्प झाली. आठ तास होऊन गेले शेकडो मजूर बोगद्यात आलेले पाणी आणि चिखल बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणखी किती वेळ जाऊ शकतो हे सांगता येत नाही अस सांगितलं जातंय.