Kopri-Pachpakhadi Election Result 2024 : कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की…?
Kopri-pachpakhadi Assembly Election Result 2024 : महायुती, शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत तर एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे हे पिछाडीवर आहेत.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महायुती, शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे हे आघाडीवर आहेत तर एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे हे पिछाडीवर आहेत. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातील पहिल्या फेरीच्या मतमोजणीनुसारस शिवसेनेचे उमेदवार एकनाथ शिंदे यांना 5 हजार 477 मतं मिळाल्याचे पाहायला मिळाले तर महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांना 1 हजार 424 मतं मिळालीत. एकनाथ शिंदे हे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून साधारण 4 हजार 53 मतांनी आघाडीवर आहेत. माहितीनुसार 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाची जागा शिवसेनेचे एकनाथ संभाजी शिंदे यांनी जिंकली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराकडून काँग्रेस उमेदवार संजय पांडुरंग घाडीगावकर यांचा पराभव करण्यात आला होता. तर यंदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आल्याने एकनाथ शिंदे गड राखणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.