कोर्लई गावच्या सरपंचांनी सोमय्यांचे आरोप फेटाळले

कोर्लई गावच्या सरपंचांनी सोमय्यांचे आरोप फेटाळले

| Updated on: Feb 16, 2022 | 7:35 PM

सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya)आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंगले कुठे आहेत? हे दाखवावं असे आवाहन सोमय्यांना केले होते. त्यानंतर सकाळीच सोमय्यांनी पत्रकार परिषद घेत. त्या बंगल्याचा टॅक्स मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंनी (Rashmi Thackeray) भरल्याचा दावा केला. मात्र याबाबत कोलई गावच्या संरपंचांना आम्ही विचारले असता. किरीट सोमय्यांचे आरोप खोटे असल्याचे या सरपंचांनी सांगितले आहे. तसेच ती घरं अन्वय नाईक यांनी बांधली होती, अशी exclusive माहिती tv9 मराठीला त्यांनी दिली आहे.