विरारमध्ये अभूतपूर्व राडा, तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल, 'बविआ'कडून भांडाफोड

विरारमध्ये अभूतपूर्व राडा, तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल, ‘बविआ’कडून भांडाफोड

| Updated on: Nov 19, 2024 | 3:20 PM

विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये अडवून ठेवलं. त्यामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.

भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना तब्बल तीन तास घेरल्याचे पाहायला मिळाले. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे नालासोपारा मतदारसंघाचे उमेदवार राजन नाईक यांना विवांता हॉटेलमध्ये अडवून ठेवलं. त्यामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दरम्यान, विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील हॉटेल विवांतच्या रुम नंबर 404 मध्ये 9 लाख रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले आहेत. पैशांच्या बंडलाचे exclusive फोटो आता समोर आले आहेत. यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी पाच कोटी रूपयांचं वाटप सुरू आहे. काही डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-किती रूपयांचं वाटप झाल आहे. याची सविस्तर माहिती लिहिली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे. 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलय, असंही हिंतेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय. तर ‘बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांना वाटलं की, मी तिथे पैसे वाटण्यासाठी आलोय. निवडणूक आयोग आणि पोलिसांना चौकशी करुदे. त्यातून सत्य काय ते समोर येईल. सीसीटीव्ही फुटेज तपासा. निवडणूक आयोगाने निपक्षपाती चौकशी करावी’, अशी प्रतिक्रिया या घडलेल्या राड्यानंतर विनोद तावडे यांनी दिली आहे.

Published on: Nov 19, 2024 03:20 PM