Special Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची?

Special Report | निकाल लागला, पण कुडालमध्ये सत्ता नेमकी कुणाची?

| Updated on: Jan 21, 2022 | 12:10 AM

शिवसेना आणि राणे हा वाद जसा सर्वश्रुत आहे, तसाच राणे आणि नाईक हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूय. कधी हा वाद नारायण राणे व वैभव नाईक यांच्यात रंगतो, तर कधी नितेश राणे आणि वैभव नाईकांमध्ये. यावेळी वादाचं कारण ठरलंय कुडाळ नगरपंचायतीचा निकाल. भाजपची सत्ता जाऊन इथं 17 पैकी भाजपला 8 आणि शिवसेनेला 7 जागा आल्या. काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आल्यामुळे अर्थातच सत्तेची सूत्रं काँग्रेसच्या हाती गेली आहेत.

शिवसेना आणि राणे हा वाद जसा सर्वश्रुत आहे, तसाच राणे आणि नाईक हा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरूय. कधी हा वाद नारायण राणे व वैभव नाईक यांच्यात रंगतो, तर कधी नितेश राणे आणि वैभव नाईकांमध्ये. यावेळी वादाचं कारण ठरलंय कुडाळ नगरपंचायतीचा निकाल. भाजपची सत्ता जाऊन इथं 17 पैकी भाजपला 8 आणि शिवसेनेला 7 जागा आल्या. काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आल्यामुळे अर्थातच सत्तेची सूत्रं काँग्रेसच्या हाती गेली आहेत. त्यावरुन मात्र शिवसेनेचे वैभव नाईक
कुडाळमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आल्याचा दावा करतायत. तर दुसरीकडे कुडाळमध्ये सत्ता कुणाची, हे अजून स्पष्ट व्हायचं असल्याचा दावा निलेश राणेंनी केलाय.

वैभव नाईक आणि निलेश राणेंमधल्या वादाची ही सुरुवात आगामी विधानसभेची तयारी मानली जातेय. कारण, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून वैभव नाईकांच्या विरोधात निलेश राणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे..