Kurla Accident : ज्या बसने झाला जीवघेणा अपघात, त्या बसची अवस्था काय ?
ज्या बसमुळे हा अपघात झाला ती रात्री उशीरा अपघातग्रस्त परिसरातून बाहेर काढून कुर्ला आगारात नेण्यात आली. या बसच्या पुढल्या काचेल शेकडो तडे गेले असून ती अक्षरश: मोडकळीस आली आहे.
सोमवारी रात्री बेस्टच्या एक बसने कुर्ला पश्चिमेकडील अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर काही जणांना चिरडलं, अनेक गाड्यांना धडकही दिली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. भाभा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ज्या बसमुळे हा अपघात झाला ती रात्री उशीरा अपघातग्रस्त परिसरातून बाहेर काढून कुर्ला आगारात नेण्यात आली. या बसच्या पुढल्या काचेल शेकडो तडे गेले असून ती अक्षरश: मोडकळीस आली आहे. बसचे हेडलाईट्सही तुटले आहेत.
अपघातावेळी त्या बसमध्ये 60 प्रवासी होते. कुर्ला डेपोतून निघताच काही वेळात या बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगाने आलेल्या बसने 30-40 गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला.