Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस चालवणारा ड्रायव्हर मद्यधुंद की ब्रेक फेल? संतप्त जमावानं बेदम धुतलं, व्हिडीओ व्हायरल
कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कुर्ल्यातील या अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. एस.जी.बर्वे रोडवर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
कुर्ल्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बस चालकाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. बस चालकाला मारहाण करतााचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल ४९ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर भाभा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ६० प्रवासी प्रवास करत होते. कुर्ला पश्चिमेला असलेल्या एस.जी.बर्वे रोडवर काल सोमवारी रात्री ९. ३० वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कुर्ल्यातील या अपघातामुळे मुंबईकर हादरले आहेत. एस.जी.बर्वे रोडवर भरधाव वेगाने येणारी अनियंत्रित बस गर्दीत घुसली आणि ते पाहून लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी अनियंत्रित झालेल्या आणि भरधाव वेगात असलेल्या या बसने ३० ते ४० गाड्यांना जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावर अनेक नागरिकांना या बसने चिरडले. त्यामुळे काही नागरिक गंभीर जखमी झाले. तर काहींना यात जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने बसचा ड्रायव्हर संजय मोरे (५४) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. नागरिकांच्या मते संजय मोरे हा बसचा ड्रयव्हर मद्यधुंद अवस्थेतेत बस चालवत होता. संजय मोरे याला काल पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.