Satara Car Hijack: साताऱ्यातील कार हायजॅक प्रकरण ऐका धाडसी आईकडून

Satara Car Hijack: साताऱ्यातील कार हायजॅक प्रकरण ऐका धाडसी आईकडून

| Updated on: Jun 28, 2022 | 3:30 PM

साताऱ्यातील पुसेगावमध्ये धक्कादायक घडना घडली. 25 जून रोजी महिला आणि तिच्या बाळासह एक कार पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचले.

साताऱ्यातील पुसेगावमध्ये धक्कादायक घडना घडली. 25 जून रोजी महिला आणि तिच्या बाळासह एक कार पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र महिलेनं दाखवलेल्या धाडसामुळे तिचे आणि बाळाचे प्राण वाचले. जवळपास पाच ते सात मिनिटं ही झटापट चालू होती. अखेर याप्रकरणी पुसेगाव पोलिसांनी चोराला अटक केली आहे. अभिजीत फडतरे असं आरोपीचं नाव आहे. वकील महेश गोरे आणि त्यांची पत्नी वकील जयश्री गोरे हे शिखर शिंगणापूरहून पुसेगाव मार्गे साताऱ्याला जात होते. रात्री पुसेगावमध्ये पाणी घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. महेश गाडीतून उतरल्यानंतर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या चोराने गाडी हायजॅक केली.