Lakhimpur Violence | लखीमपुरात 5 दिवसांनंतर इंटरनेट सेवा सुरू
लखीमपुरात 5 दिवसांनंतर इंटरनेट सेवा सुरू. हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यूपी सरकारने घटनेत मृत पावलेल्या सर्वांना 45 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केील आहे.
लखीमपुरात 5 दिवसांनंतर इंटरनेट सेवा सुरू. हिंसाचारानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. यूपी सरकारने घटनेत मृत पावलेल्या सर्वांना 45 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केील आहे. बुधवारी मृत भाजप कार्यकर्ते श्याम सूंदर यांच्या कुटुंबीयांना 45 लाखांचा चेक देण्यात आला आहे. भाजपचे इतर 2 मृत कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि ड्रायव्हर ओम मिश्रालाही चेक मिळाला आहे. शिवाय यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा सध्या लाखीमपूर खीरी हिंसाचारात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना भेट घेतली. याच दरम्यान, प्रियंका गांधींनी या घटनेत मृत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांनाही भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, हे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी इच्छुक नसल्याचं काळल्यानं, त्यांनी भेटण्याऐवजी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत