Mhada Exam | भूमी अभिलेख परीक्षा प्रक्रियेतून GA टेक्नॉलॉजी कंपनीला वगळण्याचा प्रस्ताव
आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यावर या प्रक्रियेतून संबंधित कंपनीला वगळण्याचा भूमी अभिलेख विभागाने पाठवला शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. 23 जानेवारीला प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील एक हजारहून अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा सहभाग आहे
आरोग्य भरती आणि म्हाडा परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यावर या प्रक्रियेतून संबंधित कंपनीला वगळण्याचा भूमी अभिलेख विभागाने पाठवला शासनाला प्रस्ताव पाठवला आहे. 23 जानेवारीला प्रस्तावित असलेल्या राज्य शासनाच्या भूमि अभिलेख विभागातील एक हजारहून अधिक पदांच्या भरती प्रक्रियेत जीए टेक्नॉलॉजी कंपनीचा सहभाग आहे. आरोग्य भरती, म्हाडा पेपरफुटी प्रकरणात जीए टेक्नॉलॉजीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख पोलिसांच्या अटकेत आहे. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका तयार करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागच करत आहे, तर जीए टेक्नॉलॉजी कंपनीकडे तांत्रिक जबाबदारी आहे. भूमि अभिलेख विभागाकडून विविध संवर्गातील पदांच्या भरतीची जाहिरात 1 डिसेंबरला जाहीर करण्यात आलंय.
Latest Videos