Kolhapur | कोल्हापुरात गुडाळवाडी ते करंजफेन दरम्यान दरड कोसळली
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुडाळवाडी ते करंजफेन दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. सध्या ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गुडाळवाडी ते करंजफेन दरम्यान दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे. सध्या ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे. गेले काही दिवस परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. जोराचा पाऊस सुरू असताना गुडाळवाडीजवळ डोंगराला लागून नदीच्या काठाने असलेल्या रस्त्यावर डोंगराचा काही भाग आज ढासळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; परंतु राधानगरी, करंजफेण, गुडाळवाडी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
Latest Videos