मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक खोळंबली; रस्ते बंद होण्याचं कारण काय?
दरम्यान, तर रत्नागिरी जिल्ह्यात आता दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांपुर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्यानंतर प्रशसासनाने तिकडे धाव घेत रस्ता मोकळा केला होता.
रत्नागिरी, 27 जुलै 2023 | कोकणात पावसाचं थैमान सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, तर रत्नागिरी जिल्ह्यात आता दरड कोसळण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांपुर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. त्यानंतर प्रशसासनाने तिकडे धाव घेत रस्ता मोकळा केला होता. पण त्यावेळी वाहतूक ठप्प झाली होती. आता अशीच घटना रत्नागिरी – हातखंबा मार्गावरील निवळी घाटात घडली असून वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम असल्याने आज सकाळी दरड कोसळली. ती दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर सध्या ही दरड हटवण्याचं काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे.
Published on: Jul 27, 2023 10:42 AM
Latest Videos