Landslide Video : बद्रीनाथमध्ये भूस्खलन अन् राष्ट्रीय महामार्ग बंद, पाहा थरारक व्हिडीओ

Landslide Video : बद्रीनाथमध्ये भूस्खलन अन् राष्ट्रीय महामार्ग बंद, पाहा थरारक व्हिडीओ

| Updated on: Jul 10, 2024 | 2:00 PM

पातळगंगा लंगसी बोगद्याजवळ ही भयानक भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चमोली जिल्ह्यातील पाताळ गंगा परिसरात ही मोठी भूस्खलन झाली असून 37 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून महामार्गावर पडताना दिसतोय.

उत्तराखंडमधून भूस्खलनाचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, तो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. बुधवारी उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. पातळगंगा लंगसी बोगद्याजवळ ही भयानक भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चमोली जिल्ह्यातील पाताळ गंगा परिसरात ही मोठी भूस्खलन झाली असून 37 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून महामार्गावर पडताना दिसतोय. एएनआय या वृत्तसंस्थेने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये, डोंगराचा एक मोठा भाग कोसळून महामार्गावर पडतो, दोन्ही बाजूला लोक दिसत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडताना दिसत असून यामुळे राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे

Published on: Jul 10, 2024 02:00 PM