Nashik | नाशिकच्या चांदेश्वरी तीर्थक्षेत्रात भाविकांची मोठी गर्दी

| Updated on: Aug 23, 2021 | 6:56 PM

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरत असल्याने लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि पर्यटनस्थळावर बंदी असल्याने यावेळी भाविकांना मज्जाव करण्यात आला होता.

नाशिक : प्रशासनाने मंदिर आणि पर्यटनस्थळावर बंदी घातलेली असली तरी देखील प्रशासनाला न जुमानता नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चांदेश्वरी तीर्थक्षेत्राला आज आज हजारो भाविकांनी गर्दी केली. तेथील कुंड व नदीपात्रात भाविकांनी स्नान देखील केले. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरत असल्याने लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि पर्यटनस्थळावर बंदी असल्याने यावेळी भाविकांना मज्जाव करण्यात आला होता. मात्र बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांशी हुज्जत घालत भाविकांनी चांदेश्वरी येथे मोठी गर्दी केली होती.