शिक्षणासाठी गुडघाभर चिखलातून पायपीट, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

शिक्षणासाठी गुडघाभर चिखलातून पायपीट, जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

| Updated on: Jul 28, 2023 | 8:38 AM

VIDEO | राजुरा-गोवरी मार्गाचे काम संथ गतीने सुरू अन् विद्यार्थ्यांना फटका, नाईलाजानं विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास

चंद्रपूर, 28 जुलै 2023 | राजुरा येथील मागील दोन वर्षांपासून राजुरा- गोवरी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. गोवरी नाल्यावरील पुलाचे काम पावसाळ्यात सुरू आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. नाल्यावरील कच्चा रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मात्र, या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या या हाल अपेष्टा बघून प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड रोष आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राजुरा ते गोवरी मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याची माहिती मिळतेय.

Published on: Jul 28, 2023 08:38 AM