VIDEO : Lata Mangeshkar यांच्या निधनानं 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर – Lata Mangeshkar Death
एक महान पर्व संपले आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानं 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
एक महान पर्व संपले आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनानं 2 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहेत. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादी आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Latest Videos