लतादीदींच्या उत्तम प्रकृतीसाठी मोदींनी शुभ संदेश पाठवला- पियुष गोयल
लतादीदी यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह अनेक दिग्गजांनी रुग्णालयात जात लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियूष गोयल हे देखील रात्री रुग्णालयात दाख झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या प्रकृतीसाठी शुभसंदेश दिला आहे. तो संदेश त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवल्याची माहिती दिली.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याच्या ब्रिक कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. जवळपास तासभर राज ठाकरे रुग्णालयात होते. त्यानंतर लतादीदी यांची प्रकृती स्थिर असून, त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी माध्यमांशी दिली. त्यानंतर आज दिवसभरात लतादीदी यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासह अनेक दिग्गजांनी रुग्णालयात जात लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते पियूष गोयल हे देखील रात्री रुग्णालयात दाख झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या प्रकृतीसाठी शुभसंदेश दिला आहे. तो संदेश त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवल्याची माहिती दिली.
Latest Videos