VIDEO : लतादीदींनी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास, डॉक्टारांची माहिती | Lata Mangeshkar Death

VIDEO : लतादीदींनी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास, डॉक्टारांची माहिती | Lata Mangeshkar Death

| Updated on: Feb 06, 2022 | 11:51 AM

आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींनी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहीती डॉक्टारांनी दिली आहे. 

आपल्या अलौकीक आवाजाने संपूर्ण जगाला मोहून टाकणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. लतादीदींनी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहीती डॉक्टारांनी दिली आहे. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा (national mourning) जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.