गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार, कधी अन् कुठं होणार लोकार्पण?
VIDEO | लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा, कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती; कधी होणार लोकार्पण? s
नाशिक : भाजपाचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सर्वात उंच पुतळा हा नाशिकच्या नांदूर शिंगोटे येथे साकारण्यात आला आहे. याच सर्वात मोठ्या पुतळ्याचे उद्या लोकार्पण होणार आहे. यावेळी नितीन गडकरी, पंकजा मुंडे, मुख्यमंत्री आणि सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. जवळपास सोळा फूट उंचीचा हा पुतळा आहे. यामध्ये मुंडेंच्या सार्वजनिक कार्यक्रमाला नितीन गडकरींची पहिल्यांदाच उपस्थिती असल्याने राजकीय चर्चा होऊ लागल्या आहेत. भाजप नेते नितीन गडकरी पहिल्यांदाच गोपीनाथ मुंडे यांच्या संदर्भातील सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने नितीन गडकरी या कार्यक्रमात नेमकं काय बोलतात? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागणार आहे. तर नाशिकच्या सिन्नर येथील नांदूर शिंगोटे या गावात लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. त्याच्या लोकार्पण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या ( शनिवार, 18 मार्च ) हा सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे.