आबांची आठवण, आईचा संघर्ष अन् विरोधकांचा सुड… पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटलांचं तुफान भाषण
राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा लेक रोहित पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यंदा पहिल्यादांच निवडणुकीच्या रिंगणात उतणाऱ्या उमेदवारांची चर्चा होतेय. बघा तुफान भाषण...
राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील हा पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. रोहित पाटील यंदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. तासगांव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील यांना उमेदवारी मिळाली असून ते निवडणूक लढवत आहेत. आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, निवडणुकीतील प्रचाराच्या पहिल्या भाषणात रोहित पाटील यांनी आबांची आठवण, आईचा संघर्ष अन् विरोधकांचा सुड या सगळ्याच मुद्यांचा वेध घेतला. पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरताच रोहित पाटील यांनी तुफान भाषण केल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांना भावनिक साद घालत रोहित पाटील यांनी भाषणाची सुरुवात केली. रोहित पाटील म्हणाले, ‘आर. आर. पाटील आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांची कमी मला तुम्ही कधीही भासू दिली नाही. कार्यकर्त्यांची मान कधीही खाली जाऊ देणार नाही याची मी काळजी घेईन. अनेक निवडणुकात पक्षाने माझे स्टार प्रचाराकडून निवड केली होती. लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवारासाठी मी सभा घेतल्या. पण स्वतः निवडणुकीला उभारल्यावर भाषण काय करायचं असतं. काय बोलायचं असतं याचं मला कल्पनाच नव्हती.’, असे त्यांनी म्हटले.