Raj Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल होणार? गुणरत्न सदावर्ते यांनी काय केली मागणी?
VIDEO | मुंबईतील टोल नाक्यावरील टोल दरवाढी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल होत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बघा काय केली मागणी?
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल होत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुलुंड टोल नाका संदर्भात मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्याला भेट देत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी इशारा दिला की, सर्व टोल नाका जाळून टाकू असं वक्तव्य केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. या वक्तवावर कष्टकरी जनसंघ हे हिंदू राष्ट्र भाषा मानणारा आहे, असे सदावर्ते यांनी म्हटले असून यापुढे कोणतीच दादागिरी पुढे चालू देणार नाही खपून देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांना सदावर्ते यांनी दिला आहे. तर कष्टकरी जनसंख्येची 154 सीआरपी खाली तक्रार आहे, त्यामुळे तातडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी सदावर्ते यांनी केली आहे.