‘लक्ष्मण हाके भाजपचे हस्तक’, हातातून माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
खंडणीसह अनेक गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची अप्रत्यक्षपणे बाजू घेणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आपल्या भूमिकेपासून पलटी मारली. आपण वाल्मिक कराडच्या नव्हेतर ओबीसी आणि मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचे म्हटले.
परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी गेलेल्या लक्ष्मण हाके यांचं भाषण काही स्थानिकांनी थांबवल्याची घटना घडली. लक्ष्मण हाके हे भाजपचे हस्तक आहेत. ते आंबेडकरी जनतेची दिशाभूल करतायत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. खंडणीसह अनेक गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडची अप्रत्यक्षपणे बाजू घेणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी आपल्या भूमिकेपासून पलटी मारली. आपण वाल्मिक कराडच्या नव्हेतर ओबीसी आणि मुंडे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचे म्हटले. याच मुद्द्यावरून परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेलेल्या लक्ष्मण हाकेंना रोषाला सामोरे जावे लागले. क्रूर हत्येत एका आरोपीची बाजू का घेतात? असा सवाल लक्ष्मण हाकेला विचारण्यात आला. सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या प्रकऱणी सर्वपक्षीय आणि सर्वजातीय नेत्यांनी सभगृहात आवाज उठवला मात्र लक्ष्मण हाकेंनी देशमुखांच्या हत्येविरोधात निघालेला मोर्चा जातीविरोधात असल्याचे सूचित केलं. जर तर अशा शब्दांवरून इशारे-प्रतिइशारे मराठा-ओबीसी आरक्षण वादातही देण्यात आले. त्यावेळी लक्ष्मण हाकेंसह अनेक नेत्यांनी जाती समुहाला लागू होतील अशी विधानं केली होती. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट