चिंचवड पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अश्विनी जगताप ढसाढसा रडल्या अन्…, बघा व्हिडीओ
VIDEO | चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय, विजयानंतर पतीच्या स्मृतीस्थळी दिली भेट
पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. या विजयानंतर अश्विनी जगताप यांनी त्यांचे पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली आणि वंदन केले. यावेळी स्मृतीस्थळी नमस्कार करत असताना अश्विनी जगताप भावूक होऊन त्यांना अक्षरश: रडू कोसळलं. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर आधीच मोठं संकट कोसळलेलं होतं. त्यानंतर चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार यावरुन तिथे चर्चा होती. अनेक चर्चांनंतर भाजपकडून तिथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक अश्विनी जगताप यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप आव्हानात्मक होती आणि अखेर त्यांचा विजय झाला.
Published on: Mar 02, 2023 07:20 PM
Latest Videos