अश्विनी जगताप यांच्या लेकीची भावनिक प्रतिक्रिया, 'पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले अन्...'

अश्विनी जगताप यांच्या लेकीची भावनिक प्रतिक्रिया, ‘पप्पांना जाऊन पंधराच दिवस झाले अन्…’

| Updated on: Mar 02, 2023 | 8:26 PM

VIDEO | चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालात अश्विनी जगताप यांच्या विजयानंतर कन्या ऐश्वर्या जगताप हिची प्रतिक्रिया, 'आज नवा सूर्य उगवतोय...'

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर अश्विनी जगताप आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली. यावेळी अश्विनी जगताप यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहिल्या मिळाले. तर संपूर्ण जगताप कुटुंब, त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते भावूक झाले. यावेळी अश्विनी जगताप यांची मुलगी ऐश्वर्या जगताप यांनी आईच्या विजयावर प्रतिक्रिया दिली. आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात… असे म्हणत पप्पांनी केलेल्या कामांची ही पावती आहे. त्यांनी खरंच काम केलेलं आहे म्हणूनच लोकांनी हा कौल आमच्या घरातच दिलाय. भाजपला कौल दिलेला आहे, असे म्हटले आहे. तर आमचा सूर्य 3 तारखेलाच मावळलेला आहे. पण अख्खं पिंपरी चिंचवड, सगळे कार्यकर्ते, तसेच आमचा सर्व परिवार, आज नवा सूर्य उगवतोय तो माझ्या आईच्या रुपात”, असं ऐश्वर्या म्हणाल्या.

Published on: Mar 02, 2023 08:26 PM