पालकमंत्र्याच्या जिल्ह्यातच अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी, भर सभेत देसाई यांची खिल्लीही उडली
अजित पवार यांनी याच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यावर शंभुराज देसाई सतत टिव्हीवर येत प्रतिक्रिया देतात. तर सतत बोलतात. यावरून टीका करताना अजित पवार यांनी हे गूबू गूबू करतंय असं म्हटलं होतं.
पाठण (सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यात सध्या जोरदार कलगितुरा पहायला मिळत आहे. अजित पवार यांनी याच्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यावर शंभुराज देसाई सतत टिव्हीवर येत प्रतिक्रिया देतात. तर सतत बोलतात. यावरून टीका करताना अजित पवार यांनी हे गूबू गूबू करतंय असं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी भर सभेत शंभुराज देसाई यांची खिल्ली उडवली. पाटण बाजार समितीच्या निवडणूकीवरून बोलताना अजित पवार यांनी देसाई यांना टोला लगावला. ते म्हणाले राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला होता,”शड्डू ठोकून विकासकामं होत नाही, आपली तब्येत काय, आपण करतोय काय”?