मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांचा उपरोधिक टोला; म्हणाले, ‘कामं झाल्यावर बघा…मुंबई’

| Updated on: Jun 26, 2023 | 7:33 AM

पहिल्याच पावसात मुंबई जेथे पाणी साचत नव्हते तेथेही पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळालं. यामुळे नागरिकांचे हाल झाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी "पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता" असा सवाल केला

मुंबई : राज्यात यंदा जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने हजेरी लावली. मात्र या पहिल्याच पावसाने मुंबईच्या नालेसफाईचे चित्र स्पष्ट केले. पहिल्याच पावसात मुंबई जेथे पाणी साचत नव्हते तेथेही पाणीच पाणी झाल्याचे पहायला मिळालं. यामुळे नागरिकांचे हाल झाले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी “पाऊस आल्याचे स्वागत करा. मुंबईत पाणी तुंबलय याची तक्रार काय करता” असा सवाल केला. त्यावरून आथा जोरदार राजकारण रंगलं आहे. तर यावरून ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका करताना, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागल्याने शिंदे यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं आहे. त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील मुंबईत पाणी तुंबल्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांना उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी, किती कामे सुरु आहेत, कामे सुरु असल्याने काही ठिकाणी पाणी साचलंय. कामं झाल्यावर बघा, मुंबई अजिबात तुंबणार नाही असा टोला लगावला आहे.

Published on: Jun 26, 2023 07:23 AM
ओवेसींच्या सभेत औरंगजेबाच्या घोषणा; संभाजीराजे छत्रपती म्हणतात,”हे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत”
मुंबईची तुंबई! आरोप-प्रत्यारोप फैरी सुरू; शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांच्यानंतर अजितदादाही तुटून पडले!