मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या विधानावर विजय वडेट्टीवार ठाम? नेमकं काय म्हणाले? बघा…
VIDEO | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'त्या' विधानावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माझा सोर्स सांगतो की मुख्यमंत्री बदलणार'
यवतमाळ, १९ ऑगस्ट २०२३ | विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक वक्तव्य केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 पर्यंत शिंदे मुख्यमंत्री राहतील, असं सांगितलं. त्यावरून चर्चांना उधाण आलेलं असतानाच वडेट्टीवार यांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे यांच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील, हे बावनकुळे सांगत असतील तर त्यावर माझा विश्वास अजिबात नाही. कारण बावनकुळेंना किती माहिती आहे मला माहिती नाही. त्यांचा सोर्स काय आहे हे मला माहिती नाही. खरतर राज्यात मुख्यमंत्री कोण? असा सवाल विचारला जातोय. शिंदेंचा मुलगा मुख्यमंत्री की तीन उपमुख्यमंत्री? जे मुख्यमंत्री झाले त्यांना काम करू दिलं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते अर्धे मुख्यमंत्री झाले. अर्ध्यामधून त्यांचा अर्धा हिस्सा पुन्हा काढून घेतला. 105 लोक घेऊन पाव हिस्सा घेतला. तर ही मंडळी स्वस्थ बसणारी नाहीत. माझ्याकडे जी माहिती आहे, ती खरी आहे. जोवर सरकार चाललं आहे. तोवर बावनकुळेंना त्यांच्याच बाजूने बोलावं लागणार आहे. पण माझा सोर्स मला सांगतो की राज्याचा मुख्यमंत्री बदलणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं आहे.