मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jul 07, 2024 | 2:30 PM

मुख्यमंत्री.. मुख्यमंत्री म्हणून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, चंद्रपूर जिल्ह्यातील सत्कार कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्याहाड- खुर्द या गावी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदार संघाच्या नवनीनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर व्याहाड- खुर्द या गावी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन लोकसभा मतदार संघाच्या नवनीनिर्वाचित काँग्रेस खासदारांचा सत्कार सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. चंद्रपूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्या. तर गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांचा सत्कार स्वीकारला. आपल्या भाषणातून त्यांनी राज्यात महाविकास आघाडी आणि काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे सांगत मुख्यमंत्री…. मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख करू नका. मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या. लोकसभेत महाविकास आघाडीला 30 खासदार जनतेने दिले असून विधानसभेत 200 आमदार निवडून आणू असा निर्धार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

Published on: Jul 07, 2024 02:30 PM