शिरूरच्या जागेवरील तिढा सुटला, आढळराव लोकसभा लढणार; उदयनराजे आणि अडसूळांना अद्याप तिकीट नाही

शिरूरच्या जागेवरील तिढा सुटला, आढळराव लोकसभा लढणार; उदयनराजे आणि अडसूळांना अद्याप तिकीट नाही

| Updated on: Mar 24, 2024 | 1:39 PM

शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधात लढणारच असा निर्धार व्यक्त करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आढळराव पाटील अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. लवकरच अजित दादांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रवेश होणार

महायुतीतील शिरूरच्या जागेवरील तिढा अखेर सुटला आहे. शिंदे गटातील नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूरमधून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून लढणार आहे. मात्र साताऱ्यातील जागेसंदर्भात उदयनराजे भोसले यांचं काय होणार? याचा निर्णयही लवकरच होणार असल्याचे सांगितले जातेय. शिवाजीराव आढळराव पाटील यांचं तर ठरलं पण साताऱ्यातून उदयनराजे भोसले आणि अमरावतीतून आनंदराव अडसूळ यांचं अद्याप काहीच निश्चित झालं नाही. शिरूरमधून अमोल कोल्हे यांच्या विरोधात लढणारच असा निर्धार व्यक्त करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आढळराव पाटील अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत. लवकरच अजित दादांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रवेश होणार आहे. तर आतापासून रेकॉर्डब्रेक मतांनी जिंकण्याचं चॅलेंज आढळराव पाटील यांनी दिलंय. बघा नेमंक काय म्हणाले आढळराव पाटील?

Published on: Mar 24, 2024 01:39 PM