मविआच्या ‘या’ ३ नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं, बघा VIDEO
जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच वक्तव्यावरून अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई, ४ जानेवारी २०२४ : राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल केलं. जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री रामाबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी पडसाद उमटत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर याच वक्तव्यावरून अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि भाजप देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळातून देखील जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून टीका-टिप्पणी होत आहे. भाजप, अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल करण्यात येत असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं तर शरद पवार गटातील काही नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना घरचा आहेर दिला आहे.