Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री छगन भुजबळ यांना भाजपवरून घेरलं, मविआच्या नेत्यांचा हल्लाबोल काय?

मंत्री छगन भुजबळ यांना भाजपवरून घेरलं, मविआच्या नेत्यांचा हल्लाबोल काय?

| Updated on: Nov 21, 2023 | 11:37 AM

छगन भुजबळ यांच्या जरांगे पाटील यांच्यावरील आक्रमकतेवरून विरोधकांनी छगन भुजबळ यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपच्या सांगण्यावरून भुजबळ प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. बघा कोणी काय केला भुजबळ यांच्यावर घणाघात

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : छगन भुजबळ यांच्या जरांगे पाटील यांच्यावरील आक्रमकतेवरून विरोधकांनी भुजबळ यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजपच्या सांगण्यावरून भुजबळ प्रक्षोभक बोलत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलाय. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकत एक फोटोही शेअर केला. हा फोटो आठवतोय ना? असे म्हणत सुषमा अंधारे म्हणाल्या, तुम्ही कायम संघ विचारधारेच्या विरोधात दंड थोपटले मग आता भाजपच्या खेळीमध्ये का आडकत आहात? तर मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यापासून ते भास्कर जाधव यांनी भाजपकडून छगन भुजबळ यांनी टीकेसाठी ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केलाय. तर विरोधकांनी भुजबळांवर टीका करताना भाजपकडे बोट दाखवलंय. दुसरीकडे अंतरवाली सराटीमधील लाठीचार्ज फडणवीस यांच्या आदेशावरून झालेला नाही, अशी माहिती आरटीआयमधून समोर आलीये. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 21, 2023 11:35 AM