ठाकरे गटाचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेणार, काय आहे भेटीमागचं कारण?

ठाकरे गटाचे नेते राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेणार, काय आहे भेटीमागचं कारण?

| Updated on: Apr 24, 2023 | 11:41 AM

VIDEO | अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते जाणार राजभवनावर अन् घेणार राज्यपाल रमेश बैस यांची भेट, काय आहे कारण?

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेणार आहे. राजभवनावर दुपारी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते दाखल होणार असून खारघरमधील डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी भेट घेणार आहेत. खारघरच्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाकरे गटासह इतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. दरम्यान, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात ठाकरे गटाचे नेते राजभवनावर दाखल झाल्यानंतर खारघरमधील डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात श्री सदस्यांच्या मृत्यूप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहेत. यासह राज्यातील अवकाळी पावसाची स्थिती आणि अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली नुकसान भरपाईची मदत यामुद्द्यावर देखील ठाकरे गटाचे नेते चर्चा करणार आहेत.

Published on: Apr 24, 2023 11:41 AM