Special Report | कार्यकर्ते सुसाट, नेते हैराण
बंडखोर महाराष्ट्रात आले. सरकारमध्ये सहभागी झाले. यातले काहीजण मंत्रीही झाले. तरीही त्यांना येणाऱे अनोळखी फोन कॉल्स काही कमी झाले नाहीत. सत्तारांच्या कार्यकर्त्यानं तर किती पैसे मिळाले अशी विचारणाच केली होती. सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेल्या संदीपान भुमरेंनाही एका कार्यकर्त्यानं फोन करुन ठाकरेंची साथ का सोडली अशी विचारणा केली होती.
मुंबई : शिवसेनेत(Shivsena) बंड केल्यापासून बंडखोर आमदारांच्या मागे लागलेला फोन कॉल्सचा ससेमिरा काही केल्या कमी होत नाही. बंडखोर महाराष्ट्रात आले. सरकारमध्ये सहभागी झाले. यातले काहीजण मंत्रीही झाले. तरीही त्यांना येणाऱे अनोळखी फोन कॉल्स काही कमी झाले नाहीत.
आता संजय शिरसाट यांचंच उदाहरण घ्या. काही दिवसांपूर्वी शिरसाटांना एका कार्यकर्त्याचा फोन आला आणि कार्यकर्त्यानं त्यांना चक्क स्वच्छतागृह बांधण्याची विनंती केली. जसा कार्यकर्त्याचा फोन शिरसाटांना आला. तसाच फोन गोव्यात असताना अब्दुल सत्तारांनाही आला होता.
सत्तारांच्या कार्यकर्त्यानं तर किती पैसे मिळाले अशी विचारणाच केली होती. सध्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालेल्या संदीपान भुमरेंनाही एका कार्यकर्त्यानं फोन करुन ठाकरेंची साथ का सोडली अशी विचारणा केली होती.
याआधी सुद्धा भुमरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मिर्चीवाल्या पोस्ट सोडण्याचे आदेश दिले होते. ते प्रकरणही चांगलंच गाजलं होतं. कार्यकर्त्यांना उत्तरं देताना काही नेत्यांचा तोलही सुटला होता. शिंदे गटात असलेले आमदार संतोष बांगर हे त्याचंच उदाहरण. संतोष बांगर यांना काही कार्यकर्त्यांनी उसनवारीनं पैसेही मागितले होते.
रामदास कदमांना शिवसेना फुटीनंतर अश्रू अनावर झाले होते. त्यांनाही काही कार्यकर्त्यांनी फोन केले होते. कार्यकर्ते फोन करुन नेत्याची मजा घेतायत आणि फोन कॉल व्हायरलही करतायत. नेत्याला फोन करताना. नेत्याला जाब विचारताना हे कार्यकर्ते जराही घाबरत नाहीत. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना सध्या याचाच प्रत्यय येतोय.