'बाप-लेकीला सोडून अजितदादांसोबत चला...', शरद पवारांच्या खासदारांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा प्रस्ताव अन्...

‘बाप-लेकीला सोडून अजितदादांसोबत चला…’, शरद पवारांच्या खासदारांना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा प्रस्ताव अन्…

| Updated on: Jan 08, 2025 | 3:55 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत चला, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाच्या खासदारांना असा प्रस्ताव होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना सोडून इतर सर्व खासदारांना सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव पाठविल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना हा प्रस्ताव दिलं असल्याचे सूत्र सांगताय. सुप्रिया सुळे सोडून शरद पवार गटाच्या सर्व खासदारांना हा प्रस्ताव होता, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या होत्या. यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केली. असा विचार येतोच कसा? असा सवाल करत सुप्रिया सुळेंकडून सुनील तटकरे यांच्याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त केली, असंही सूत्रांकडून कळतंय.

Published on: Jan 08, 2025 03:55 PM