Ashraf Ghani | अफगाण सोडून राष्ट्राध्यक्ष अशरफ घनींचं पैशाने भरलेल्या 4 गाड्या घेऊन पलायन
अशरफ घनी सध्या अज्ञातवासात आहेत. ताजिकिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर घनी यांना घेऊन जाणारे विमान ओमानमध्ये असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी हे देश सोडून पळाले आहेत. घनी यांनी रविवारी राजधानी काबूलमधून चार कार आणि रोख रकमेने भरलेल्या हेलिकॉप्टरसह देश सोडला. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इश्चेन्को यांच्या माहितीनुसार, “चार कार पैशांनी भरलेल्या होत्या, त्यांनी पैशाचा दुसरा भाग हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला, पण सर्व बसवता आले नाही आणि काही पैसे रस्त्यावर पडले होते.” तालिबान समर्थकांनी अफगाणिस्तान काबीज केले आहे, त्यानंतर अफगाणिस्तानच्या भविष्यात अस्थिरतेची चिन्हे दिसत आहेत. अशरफ घनी सध्या अज्ञातवासात आहेत. ताजिकिस्तानमध्ये उतरण्यास परवानगी नाकारल्यानंतर घनी यांना घेऊन जाणारे विमान ओमानमध्ये असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. अहवालांनी असेही म्हटले आहे की घनी अमेरिकेत जात आहेत.
Latest Videos