Legislative Council : पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना डावललं? भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित
भाजप नेते प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे . यांची नावं निश्चित झाल्याची सूत्रांनी माहिती आहे.
मुंबईः राज्यात सध्या विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. याताच आणखी आणकी एक मोठी घडामोड समोर आली आ. भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित झाली आहे. भाजपच्या (BJP) या यादीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह, भाजप नेते प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे . यांची नावं निश्चित झाल्याची सूत्रांनी माहिती आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे यातच आणखी एक मोठी बातमी असून सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांचा पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंबंधितीच शक्यता मंगळवारी व्यक्त केली जात होती. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, असं काल बोललं जातत होतं.