Special Report | गर्दीमुळेच कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला

Special Report | गर्दीमुळेच कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला

| Updated on: Jan 31, 2022 | 11:13 PM

नाशिकच्या (Nashik) जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात आढळलेल्या बिबट्याला (Leopard) अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नाशिक: नाशिकच्या (Nashik) जयभवानी रोड (Jay Bhavani Road) परिसरात आढळलेल्या बिबट्याला (Leopard) अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या सर्व प्रकारात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा बिबट्या मानवी वस्तीमध्ये आढळून आल्याने चर्चांना उधान आले आहे. बिबट्याला पहाण्यासाठी नागरिक गर्दी करतात, गर्दीमुळे बिबट्या घाबरतो. आणि तो नागरिकांवर हल्ला करतो, असे अनेकदा पहायला मिळाले आहे. नाशिकमध्ये देखील असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

Published on: Jan 31, 2022 11:13 PM