Pune | पिंपरखेड येथे बिबट्या कळपाने फिरताना मोबाईलमध्ये कैद, परिसरात भितीचं वातावरण
पुणे जिल्ह्यातील पिंपरखेड येथे बिबट्यांचा कळप फिरताना दिसला आहे. रात्री शेतीस पाणी देण्याकरता गेलेल्या शेतकऱ्याला हा कळप दिसला असून त्याने मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन घडलं आहे. पिंपरखेड येथे बिबट्यांचा कळप फिरताना दिसला आहे. रात्री शेतीस पाणी देण्याकरता गेलेल्या शेतकऱ्याला हा कळप दिसला असून त्याने मोबाईलमध्ये या सर्वांचा व्हिडीओ काढला आहे. संबधित शेतकरी चारचाकी वाहणांत असल्याने बचावला असं त्याचं मत असून रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्याने रात्री-अपरात्री शेतीस पाणी देण्याकरता जावे लागत असल्याची व्यथा त्याने मांडली आहे. तसेच शासनाला दिवसा वीज पुरवण्याची मागणीही केली आहे.
Published on: Nov 01, 2021 07:42 PM
Latest Videos