वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी… बारामतीकरांच्या भूमिकेचं ‘ते’ पत्र व्हायरल, नेमकं काय म्हटलंय त्यात?
वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी... अस म्हणत बारामतीकरांच्या भूमिकेचं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. यादरम्यान, नणंद विरुद्ध भावजाय आण काका विरूद्ध पुतणे यांच्या वादात आता आणखी एक पुतणे समोर आलेत. राजेंद्र पवार शरद पवार यांचे पुतणे आणि रोहित पवार यांचे वडील
मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : बारामतीकरांची भूमिका म्हणून बारामतीत एक पत्र चांगलंच व्हायरल होतंय. त्या पत्रावर बोलताना रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांनी पहिल्यांदाच त्यांची राजकीय कारकिर्द कशी मागे पडली यावर भाष्य केले. वाजवा तुतारी अन् गाडा गद्दारी… अस म्हणत बारामतीकरांच्या भूमिकेचं एक पत्र सध्या व्हायरल होतंय. यादरम्यान, नणंद विरुद्ध भावजाय आण काका विरूद्ध पुतणे यांच्या वादात आता आणखी एक पुतणे समोर आलेत. राजेंद्र पवार शरद पवार यांचे पुतणे आणि रोहित पवार यांचे वडील. शरद पवार मुख्यमंत्री असताना अजित पवार आणि राजेंद्र पवार हे दोन्ही राजकारणात येण्यास इच्छुक होते. मात्र त्यावेळी अजित पवार यांना संधी मिळाली आणि राजेंद्र पवार यांनी शेतीचं काम स्वीकारलं. मात्र तेव्हा जर आपण राजकारणात येण्याचा आग्रह धरला असता तर आताची फूटही तेव्हाच पडली असती. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय केलं रोहित पवार यांच्या वडिलांनी वक्तव्य?