छगन भुजबळ यांच्यासाठी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल, काय म्हटलं होतं पत्रात?
VIDEO | छगन भुजबळ यांच्यासाठी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं एक पत्र सध्या व्हायरल होत आहे. हे पत्र शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आलं आहे. ज्यावेळी भुजबळ हे जेलमध्ये होते. तेव्हा भुजबळांना जेलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी विनंती केल्याचं पत्र फडणवीसांना लिहिलं होतं.
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं एक पत्र चांगलंच व्हायरल होत आहे. ज्यावेळी छगन भुजबळ हे जेलमध्ये होते. त्यावेळी छगन भुजबळ यांना जेलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी विनंती केल्याचं पत्र देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं होतं. अजित पवार गटानं शरद पवार यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हुकूमशाह म्हटल्यानंतर शरद पवार गटाकडून हे पत्र जाहीर करण्यात आलं आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते गेल्या २ वर्षांपासून ते जेलमध्ये आहेत. त्यांची तब्येत नाजूक आहे. भुजबळांना योग्य ती वैद्यकीय सेवा मिळावी. एवढीच अपेक्षा आहे. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे. त्यांच्या तब्येतीबाबत तुम्हीही जाणताच. त्यांना योग्य उपचार मिळावेत याची काळजी तुम्ही घ्यालच, असे शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं होतं.
Published on: Oct 15, 2023 01:05 PM
Latest Videos