Vima Sakhi Scheme : मोदी सरकारकडून 3 वर्षात महिलांना मिळणार 2 लाख 16 हजार, काय आहे विमा सखी योजना?

Vima Sakhi Scheme : मोदी सरकारकडून 3 वर्षात महिलांना मिळणार 2 लाख 16 हजार, काय आहे विमा सखी योजना?

| Updated on: Dec 09, 2024 | 4:52 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज सोमवारी (९ डिसेंबर) हरियाणा दौऱ्यावर असताना ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने विमा सखी योजना जाहीर केली आहे.

केंद्राकडून अर्थात मोदी सरकारकडून महिलांसाठी विमा सखी योजना राबवण्यात येत आहे. विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना मानधन देण्यात येणार आहे. अवघ्या तीन वर्षात एलआयसी महिलांना तब्बल २ लाख १६ हजार रूपयांचं मानधन देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज सोमवारी (९ डिसेंबर) हरियाणा दौऱ्यावर असताना ‘विमा सखी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकारने विमा सखी योजना जाहीर केली आहे. विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. एलआयसीकडून विमा सखी योजना राबवण्यात येणार आहे. ३ वर्षात एलआयसीकडून २ लाख १६ हजार रूपयांचं मानधन विमा सखींना देण्यात येणार आहे. विमा सखी योजनेंतर्गत पुढील तीन वर्षांत २ लाख महिलांना स्वालंबी बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेसाठी महिलांचे शिक्षण १० वी पूर्ण आणि किमान वय १८ वर्ष असणे आवश्यक आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ३५ हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी असणार आहे तर योजनेच्या माध्यमातून महिलांना ३ वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून ७ हजार रूपये दिले जाणार आहे.

Published on: Dec 09, 2024 04:52 PM